ठरलं तर मग! तेजस्वी प्रकाश करण कुंद्रासोबत या दिवशी घेणार सातफेरे, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:55 IST
1 / 9तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, या इथंपर्यंत पोहोचण्यासाठी तिने प्रचंड मेहनत आणि संघर्ष केला आहे. ही अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.2 / 9तेजस्वी प्रकाश तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच प्रसिद्धी मिळवत असते. चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण ती गेल्या दीर्घकाळापासून करण कुंद्राला डेट करत आहे.3 / 9तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा चर्चेत असतात. मात्र, प्रत्येक वेळी दोघांनीही लग्नाच्या अफवांना फेटाळून लावले आहे.4 / 9पण, नुकताच तेजस्वी प्रकाशने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने या विषयावर भाष्य केले.5 / 9या दरम्यान भारती आणि हर्षने तेजस्वीला विचारले की, ती लग्न कधी करणार? ती २०२६ मध्ये लग्न करणार का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले.6 / 9तेजस्वी प्रकाशने या गोष्टीला दुजोरा देत म्हटले की, 'हो, असं तर बोललं जात आहे. आम्ही याबद्दल चर्चा करत आहोत, पण पाहूया पुढे काय होतंय.'7 / 9अशा परिस्थितीत, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा २०२६ मध्ये लग्न करू शकतात, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.8 / 9याबद्दल पुढे बोलताना तेजस्वी म्हणाली की, लग्न तर ठीक आहे पण मुलं होतील तो क्षण माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा असेल.9 / 9यादरम्यान तेजस्वीने हर्षलाही विचारले होते की, तुम्हाला किती मुलं हवी आहेत? त्यावर तो म्हणाला की ३-४ मुलं.