1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटकांंमधून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. 2 / 8सुप्रिया यांचे खूप फॅन फोलोईंग आहेत. सुप्रिया पाठारे प्रसिद्धीझोतात येत असल्या तरी त्यांची मुलं लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. 3 / 8सुप्रिया आणि मिनेश पाठारे यांना दोन मुले आहेत मुलगा मिहीर आणि मुलगी जान्हवी. पाठारे कुटुंब अनेक वर्षे ठाण्यात राहतात.4 / 8सुप्रिया पाठारे यांची मिहीर आणि जान्हवी ही दोन्ही मुले अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. मिहीर शेफ आहे. तो त्याच्या महाराज हॉटेल व्यवसायामुळे चर्चेत आला होता. त्याने परदेशातील नोकरी सोडून ठाण्यात स्वतःचा व्यवसाय करत आहे.5 / 8महाराज या त्याच्या हॉटेलमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर सुप्रिया पाठारे यांची लेक जान्हवी तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. 6 / 8जान्हवी फारशी मीडियासमोर न आल्यामुळे ती लाईमलाईट पासून थोडीशी दूर होती. पण इन्स्टग्रामवर ती बऱ्यापैकी सक्रीय असलेली पाहायला मिळते.7 / 8जेव्हा सुप्रिया पाठारे शूटिंगनिमित्त बाहेरगावी असायच्या तेव्हा त्यांचे पती मिनेश पाठारे यांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी नेटाने सांभाळली. सुरुवातीला त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरीही केली. पण मुलांच्या जबाबदारीमुळे त्यांनी घर सांभाळणे पसंत केले. 8 / 8नवऱ्याच्या याच सहकार्यामुळे सुप्रिया पाठारे बाहेर राहून काम करू लागल्या. कधीकधी शूटिंगमधून वेळ मिळेल तसा त्या महाराजला भेट देतात आणि तिथले कामकाज देखील पाहतात.