गायकवाडांची लेक होणार राजकीय कुटुंबाची सून! पाहा प्राजक्ता आणि शंभुराजचे रोमँटिक फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:25 IST
1 / 10स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं नुकतेच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.2 / 10अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नुकताच साखरपुडा पार पडला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज असं आहे.3 / 10प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.4 / 10नुकतचे प्राजक्ता आणि शंभुराज यांचे साखरपुड्यातील वेगळ्या गेटअपमधील फोटो समोर आले आहेत. 5 / 10यात प्राजक्ताने गोल्डन रंगाची साडी आणि त्यावर ब्राउन रंगाचा नक्षीकाम असलेला ब्लाउज परिधान केला आहे. तिला मॅचिंग करत शंभुराजने ऑफव्हाइट रंगाचा कुर्ता त्यावर गोल्डन जॅकेट असलेली शेरवानी घातली आहे.6 / 10या फोटोशूटमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. त्यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.7 / 10प्राजक्ता आता राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. लवकरच शंभुराजसोबत लग्नगाठ बांधून ती पुण्यातील फुरसुंगीची सून होणार आहे.8 / 10 प्राजक्ताचा होणारा नवरा शंभूराज खुटवड हा पैलवान असून उद्योजक असल्याचं म्हटलं जातंय.9 / 10प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.10 / 10प्राजक्ताच्या साखरपुड्यानंतर तिचे चाहते तिच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.