Join us  

कुणी गर्लफ्रेंडशी केलं लग्न तर कोणाला मिळाला नवा पार्टनर! २०२३मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाचा उडाला बार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 6:50 PM

1 / 8
२०२३ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाचा बार उडाला. तर काहींनी पुन्हा लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली.
2 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने फेब्रुवारी २०२३मध्ये सुमित लोंढेशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
3 / 8
'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता ऋतराज फडकेने प्रीती रिसबुड हिच्याबरोबर सप्तपदी घेतले.
4 / 8
हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेल्या दत्तू मोरेनेही २०२३मध्ये लग्नाचा बार उडवून दिला. दत्तू गुपचूप लग्न उकरलं होतं.
5 / 8
'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडेशी लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. पियुषचं सुरुचीबरोबर हे तिसरं लग्न आहे.
6 / 8
'बिग बॉस मराठी' फेम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेनेही लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. बिग बॉसच्या घरातच अमृता-प्रसाद एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
7 / 8
टीव्ही अभिनेता संकेत पाठकने गर्लफ्रेंड सुपर्णा श्यामबरोबर सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
8 / 8
'लक्ष्य' फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रही २०२३मध्ये लग्नाच्या बेडीत अडकला.
टॅग्स :टिव्ही कलाकारफ्लॅशबॅक 2023मराठी अभिनेतासुरुची आडारकरअमृता देशमुख