काम्याने तिच्याकडे असलेल्या नोजरिंगचे कलेक्शन असलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटो खाली तिने लिहीले आहे की या सगळ्या नोजरिंगचे कलेक्शन माझे आहे, मला आणखी नोजरिंग हव्या आहेत.यावर तिला तिच्या चाहत्यांनीही एक से बढकर एक अशा कमेंटस देत तू आणखी नोजरिंगचे करणार तरी काय? असे वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत.
मुलींकडे नोजरिंग ही एक किंवा दोन इतक्याच असतात. मात्र काम्या कडे 500 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या नोजरिंग आहेत. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत काम्या म्हणते, मला नोजरिंग खूप आवडतात, नोजरिंगचे मला इतके वेड आहे की, कोणाला मला काही गिफ्ट द्यायचे असेन तर त्याने मला फक्त आणि फक्त नोजरिंगच द्यावे असेच मी म्हणेन.
जेव्हा जेव्हा मी कुठे फिरायला जाते तेव्हा तिथून फक्त नोजरिंगच खरेदी करत असते.आतापर्यंत माझ्याकडे 500हून अधिक नोजरिंगचे कलेक्शन आहे. असे काम्याने म्हटले आहे. काम्या फक्त या नोजरिंग जमाच करत नसून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नोजरिंग घालत आपले सुंदर फोटो क्लिक करत इन्स्टाग्रामवर अपडेट करत असते.दरवेळी वेगवेगळ्या ट्रेंडी नोजरिंगमध्ये काम्याचा ट्रेडिशनल आणि अट्रॅक्टीव्ह लूक दिसतो.काम्याला ज्वेलरीमध्ये फक्त नोजरिंग आवडते,त्यामुळे तिला बांगड्या,गळ्यातले नेकलेस, इअर रिंग्स, फिंगर रिंग्स यांत जास्त रस वाटत नाही.सध्या शक्ती मालिकेतून काम्या रिसकांचे मनोरंजन करत आहे.