'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडू आठवतोय का? आता दिसतो खूपच वेगळा, राणादा-अंजलीसोबतचा फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:14 IST
1 / 8तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि अंजलीशिवाय आणखी एक पात्र चांगलंच लोकप्रिय झालं होतं. ते म्हणजे लाडूचं.2 / 8लाडूची भूमिका बालकलाकार राजवीरसिंह रणजीत गायकवाडने साकारले होते. या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.3 / 8 तुझ्यात जीव रंगला मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ लोटला आहे. तरीदेखील लाडूची भूमिका साकारणारा राजवीरसिंह आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहे.4 / 8राजवीरसिंह आता खूप मोठा झाला असून त्याला आता ओळखणं कठीण झालं आहे.5 / 8नुकताच राजवीरसिंहने सोशल मीडियावर अंजली म्हणजेच अक्षया देवधर आणि राणादा म्हणजेच हार्दिक जोशीसोबतचा फोटो शेअर केला आहे.6 / 8या फोटोत राजवीरसिंह खूपच वेगळा दिसतो आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, बऱ्याच कालावधीनंतर माऊ आणि राणादासोबत.7 / 8यापूर्वी राजवीरसिंहने अक्षया आणि हार्दीकच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.8 / 8या मालिकेनंतर राजवीरसिंहने 'भारत माझा देश आहे' आणि 'येक नंबर' सिनेमात काम केले.