Join us

'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधली गायत्री चाची आठवतेय का?, आता तिला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:58 IST

1 / 10
'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये कमलिका गुहाने गायत्री आंटीची भूमिका साकारून खूप लोकप्रियता मिळवली. मात्र, आता अभिनेत्रीचा लूक खूप बदलला आहे.
2 / 10
२००० साली एकता कपूरची मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही मालिका स्टार प्लसवर प्रसारित व्हायची. स्मृती इराणी, अमर उपाध्याय, अपना मेहता, हितेन तेजवानी आणि रोनित रॉय यासारख्या कलाकारांनी या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.
3 / 10
'क्योंकी सास भी कभी बहू थी'ची आणखी एक भूमिका होती जी खूप लोकप्रिय झाली, ती म्हणजे तुलसीची काकी सासू. ही भूमिका साकारली होती कमलिका गुहाने.
4 / 10
कमलिका गुहाचा लूक खूप बदलला आहे. तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला ओळखणे कठीण झाले आहे.
5 / 10
कमलिका गुहा सध्या झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'सारू' या शोमध्ये कामिनी देवीच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेमध्येही कमलिकाचे पात्र खूप मजबूत आहे. कमलिकाची मालिका १२ मे पासून प्रसारित होण्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये ती नकारात्मक भूमिकेत दिसली आहे.
6 / 10
अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान, कमलिकाने क्योंकी सास भी कभी बहू थी सीझन २ मध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
7 / 10
क्योंकी सास भी कभी बहू थी व्यतिरिक्त, कमलिका आयुषमान, बडी देवरानी, ​​क्या हादसा क्या हकीकत, झिलमिल सिताराओं का आंगन होगा, करम अपना अपना, संतोषी माँ, ससुराल सिमर का यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. पण गायत्री आंटीच्या भूमिकेला प्रेक्षकांचे सर्वाधिक प्रेम मिळाले.
8 / 10
कमलिका गुहा ही मूळची पश्चिम बंगालची आहे आणि तिने टीव्ही इंडस्ट्रीत 'मुझे चांद चाहिये' या शोमधून पदार्पण केले आहे.
9 / 10
अभिनयाव्यतिरिक्त कमलिका मानसिक आरोग्य जागरूकता प्रोजेक्टवरही काम करते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.
10 / 10
कमलिका गुहाने लेटेस्ट मुलाखतीत सांगितले की, तिला वेगवेगळ्या प्रकारची पात्रे साकारायला आवडतात. अशा परिस्थितीत ती तिच्या पात्रांवर प्रयोग करत राहील.