Join us

लोकांना खळखळून हसविणारी भारती सिंग हळदीच्या दिवशी ढसाढसा रडली, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हीचा आज हळद समारंभ उत्साहात पार पडला. हर्ष आणि भारती लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असून, गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्यान भारतीने पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. हळद समारंभ सुरू असतानाच भारती इमोशनल झाल्याचे दिसून आले. यावेळी तिचा होणारा पती हर्ष तिला आधार देताना दिसून आला.

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हीचा आज हळद समारंभ उत्साहात पार पडला. हर्ष आणि भारती लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असून, गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्यान भारतीने पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. हळद समारंभ सुरू असतानाच भारती इमोशनल झाल्याचे दिसून आले. यावेळी तिचा होणारा पती हर्ष तिला आधार देताना दिसून आला. हळद सेरेमनीसाठी भारतीने रोहित वर्मा आणि अदा खान यांनी डिझाइन केलेला गाउन घातला होता.रोहितने सांगितले की, भारती एवढी इमोशनल झाली होती की, तिला अश्रू आवरणे अवघड झाले होते. तिला विश्वासच बसत नव्हता की, तिचे लग्न होत आहे.तर अदाने सांगितले की, आतापर्यंत आपण भारतीला लोकांना हसविताना बघितले, परंतु आज ती आम्हाला रडताना दिसली.शनिवारी रात्री उशिरापर्यंत कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी भारती रेड कलरच्या गाउनमध्ये तर हर्ष ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टक्सीडो सूटमध्ये बघावयास मिळाला.टीव्ही कपल पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांनी यादरम्यान डान्स परफॉर्मन्स केला. तर कृष्णा अभिषेक आणि सिद्धार्थने कॉमेडीचा तडका लावला.सेरेमनीमध्ये नेहा कक्कड, मनीष पॉल, सुनील ग्रोव्हर, मोनालिसा, आरजे प्रीतम सिंग, राजेश कुमार, आरजे मंत्रा सहभागी झाले होते.