पण या सगळ्यांमध्ये आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे कलाकारांची मेकअप रूम, जी त्यांच्यासाठी खूप स्पेशल असते. ज्या रु ममध्ये सकाळी आल्यापासून ते पॅकअप होईपर्यंत राहतात. आपला अर्ध्याहून अधिक वेळ ते याच रु ममध्ये असतात. त्यामुळे त्यावर त्यांचे प्रेम असणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
तितिक्षा तावडे अर्थात सर्वांची लाडकी सरस्वतीने तर उघडपणे दाखवून दिले. तिने तिच्या मेकअप रूमला स्पेशल बनविण्यासाठी चक्क सर्व रूम रंगविली. या रु मच्या भितींवर खूप सुंदर अशी परी वा मुलीचा चेहरा तिने काढला. भिंतीवर ‘किप आॅन ड्रीमिंग’ असा सुंदर मेसेजही लिहला. उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणारी अशा स्वभावाची तितिक्षा असल्यामुळे तिने या पेंटिंगच्या सुरु वातीला ‘किप आॅन ड्रीमिंग’ हा मॅसेज लिहल्याचे तिच्या सहकलाकारांनी सांगितले.
तसेच बी पॉझिटिव्ह अशी लाइन तिला मालिकेमधील वंदी हिने दिली आहे, तर ‘गीव्ह रिस्पेक्ट अॅण्ड टेक रिस्पेक्ट’ असाही संदेशही तिने लिहिला आहे.