Join us  

नेहा भसीन ते अक्षरा सिंह...! ही आहे ‘बिग बॉस ओटीटी’च्या 12 स्पर्धकांची फायनल यादी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 3:25 PM

1 / 12
‘बिग बॉस 15’च्या घराची बित्तंबातमी देणा-या ‘द खबरी’ने शोच्या फायनल 12 स्पर्धकांची यादी जारी केली आहे. तेव्हा पाहुया कोण कोण आहे या यादीत...
2 / 12
‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली स्पर्धक म्हणून बॉलिवूड सिंगर नेहा भसीनचे नाव फायनल झाले आहे. प्रामो व्हिडीओत तिच्या नावाची घोषणा झालीये. स्वॅग से स्वागत, दिल दिला गल्लां, जग घूमिया असे एकापेक्षा एक हिट गाणी देणारी सिंगर नेहा भसीन विवाहित आहे, तेवढीच बोल्ड आणि परखडही आहे.
3 / 12
यादीनुसार, अनुषा दांडेकर ही सुद्धा बिग बॉस ओटीटीमध्ये दिसणार आहे. अनुषा ही शिबानी दांडेकरची बहिण आहे. व्हिजे म्हणून करिअरची सुरूवात करणा-या अनुषाने 2008 मध्ये मुंबई मॅटिनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. अलीकडे करण कुंद्रासोबतचे तिचे अफेअर आणि ब्रेकअप दोन्ही चर्चेत होते.
4 / 12
रिद्धिमा पंडित ही सुद्धा ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये ग्लॅमरचा तडका लावताना दिसणार आहे. बहु हमारी रजनीकांत या मालिकेत झळकलेली रिद्धिमाने याआधी खतरों के खिलाडी 9 मध्येही दिसली होती.
5 / 12
‘बिग बॉस ओटीटी’च्या स्पर्धकांच्या यादीत अभिनेता करण नाथ याचेही नाव आहे. 2002 मध्ये ‘ये दिल आशिकाना’ या सिनेमात तो दिसला होता. याशिवाय एलओसी कारगील, तुम, तेरा क्या होगा जॉनी या सिनेमातही त्याने भूमिका साकारल्या आहेत.
6 / 12
टीव्ही अभिनेत्री, मॉडेल व कोरिओग्राफर दिव्या अग्रवाल ही सुद्धा या नव्या सीझनचा भाग असल्याचे कळते. एमटीव्ही स्प्लिट्सविला फेम दिव्या अग्रवालचे ‘बिग बॉस’शी जुने नाते आहे. याआधी गेस्ट म्हणून ती बिग बॉसच्या घरात आली होती.
7 / 12
पवित्रा पुनियाचा एक्स बॉयफ्रेंड प्रतीक सेहजपाल हाही ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसणार असल्याचे जवळपास फायनल झाले आहे. मॉडेल, अ‍ॅक्टर व फिटनेस ट्रेनर असलेला प्रतीक ‘बिग बॉस 14’मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेईल अशी चर्चा होती. पण आता तो ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसार आहे. रोडिजमध्ये तो दिसला होता.
8 / 12
बडे भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह या मालिकेत झळकलेली उर्फी जावेद टीव्हीच्या दुनियेतील एक लोकप्रिय चेहरा आहे. आत्तापर्यंत 10 मालिकांमध्ये झळकलेली हीच उर्फी आता ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही जलवा दाखवणार असल्याचे कळतेय.
9 / 12
अक्षरा सिंह ही भोजपुरी सिनेमातील मोठे नाव. ही अक्षरा सिंह ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात भोजपुरीचा तडका लावताना दिसणार आहे. अक्षरा सध्याची भोजपुरीची सर्वात महागडी अभिनेत्री आहे.
10 / 12
इश्क में मरजावां फेम मानस्वी वशिष्ठ हा चॉकलेटी हिरोही ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसणार आहे.
11 / 12
जीशान अली हा अलीकडे ‘हसीन दिलरूबा’ या सिनेमात झळकला होता. आता तो ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसणार आहे.
12 / 12
नेहा मलिक ही पंजाबी अभिनेत्री, मॉडेल ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये ग्लॅमरचा तडका लावणार आहे.
टॅग्स :बिग बॉस