Bigg Boss 19: सलमान खानचा शो 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार हे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:26 IST
1 / 8सलमान खानचा ब्लॉकबस्टर शो 'बिग बॉस १९' लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. बिग बॉस १९ च्या प्रीमियरला आता काही दिवसच उरले आहेत, त्यामुळे चाहत्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. आता बिग बॉस १९ साठी काही स्टार्सची नावे समोर येत आहेत. या यादीत धीरज धूपरपासून गौरव खन्नापर्यंतची नावे आहेत.2 / 8'बिग बॉस १९'साठी युट्यूबर पायल धरेचं नाव निश्चित करण्यात आले होते. तिला पायल गेमिंग म्हणूनही ओळखले जाते. पायल गेमिंगचे युट्यूबवर ४० लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. 3 / 8टीव्ही अभिनेत्री हुनर हालीने तिच्या अभिनय आणि शैलीने इंडस्ट्रीमध्ये एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री हुनर हालीचीही 'बिग बॉस १९' साठी निवड झाल्याचे सांगितले जात आहे. 4 / 8'बिग बॉस १९'साठी लोकप्रिय टीव्ही अभिनेता गौरव खन्नाला फायनल करण्यात आले आहे. चाहते स्वतःही गौरव खन्ना यांना बिग बॉस १९ मध्ये पाहू इच्छितात. यापूर्वी त्याने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये भाग घेतला होता, जिथे तो जिंकला देखील होता.5 / 8'स्प्लिट्सव्हिला' फेम सिवेत तोमरचे नावही बिग बॉस १९ साठी निश्चित करण्यात आले आहे. शोच्या फॅन पेजने सिवेत तोमर बिग बॉस १९ चा कंफर्म स्पर्धक झाल्याची पुष्टी केली आहे. 6 / 8सलमान खानच्या ब्लॉकबस्टर शो 'बिग बॉस १९' साठी धीरज धूपरचे नाव पुढे येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धीरज धूपर या शोसाठी फायनल असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अभिनेत्याने अद्याप याबद्दल काहीही सांगितलेले नाही.7 / 8'बिग बॉस १९' साठी अरबाज पटेलचे नावही समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की अरबाज पटेलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामुळे तो बिग बॉस १९ चा भाग होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.8 / 8अरबाज पटेलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, 'काही दिवसांत खूप मजा येणार आहे आणि बरेच काही घडणार आहे. मी उत्साहित आहे. ट्रोल करणाऱ्यांनो, तुमच्यासाठीही खूप काही येणार आहे, म्हणून कामाला लागा आणि मी प्रेमींसाठी तिथे आहे.'