शाहरूख आणि सलमानची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. बिग बॉस शोमध्ये जेव्हा शाहरूख आपल्या ‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता तेव्हा सलमानने त्याच्यासोबत केलेली धमाल बघण्यासारखी होती.
इन्स्पेक्टर चुलबुल पांडे बनलेल्या सलमानने शाहरूखचा घेतलेला इंटरव्ह्यू प्रेक्षकांना चांगलाच भावला.
शाहरूखनेदेखील सलमानच्या प्रत्येक प्रश्नांचे तेवढ्याच ‘जोश’मध्ये उत्तरे दिलीत.
बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट सनी लिओनी हिनेही शाहरूख, सलमानसोबत एन्जॉय केला.
दोन सुपरस्टारसोबत स्टेज शेअर करायला मिळाल्याचा आनंद सनीच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत होता.
यावेळी शाहरूख, सलमानने घरातील सदस्यांनाही टास्क देत त्यांच्यासोबत एन्जॉय केला.
बिग बॉसच्या स्टेजवरही भाईजान आणि किंग खानची जुंगलबंदी रंगली होती.
जरबदस्त रंगलेल्या या एपिसोडमध्ये सलमान-शाहरूखने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले.