एका टास्कदरम्यान रोहन मेहरा आणि बानी जे यांच्या तोंडावर लघवी फेकणाºया स्वामी ओमला बिग बॉसने घरात बाउंसर पाठवून हाकलले होते. मात्र घराबाहेरही स्वामी ओमला तोंडावर ताबा ठेवणे अशक्य होत आहे. सुरुवातीला बिग बॉस या शोवर आरोपांची सरबत्ती करताना, निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना ड्रग्ज सप्लाय केले जात असल्याचा आरोप केला होता. आता शोच्या होस्टवर म्हणजेच सलमानवर आरोप करताना स्वामी ओमने तो आयएसआय एजंट असल्याचे म्हटले आहे.
जेसन शहाला मिठी मारताना बानी जे
तर घरातील सर्वांत स्ट्रॉँग स्पर्धक असलेली बानी जे ही कॅरेक्टरलेस असून, जेव्हा जेसन शहाने वाइल्ड कार्डद्वारे घरात एंट्री केली होती तेव्हा ती त्याच्याबरोबर चार दिवस झोपली होती, असा गंभीर आरोपही केला आहे. शोच्या सुरुवातीपासूनच स्वामी ओमने घरातील सदस्यांवर आरोपांची सरबत्ती केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या विचित्र वागण्याने घरातील सदस्यांसहच बिग बॉसला सळो का पळो करून सोडले होते. दस्तूरखुद्द सलमान खानही स्वामी ओमच्या कारनाम्यांमुळे त्रस्त झाला होता.
आता घराबाहेर पडलेल्या स्वामी ओमच्या आरोपांमुळे बिग बॉसच्या निर्मात्यांची पंचाईत होत आहे. घराबाहेर पडल्यानंतर वरिष्ठ पत्रकार दिबांग यांनी जेव्हा स्वामी ओमची मुलाखत घेतली तेव्हा स्वामी ओमने, ‘जर मला पुढील दोन आठवड्यांसाठी घरात प्रवेश दिला नाही तर मी ग्रॅण्डफिनाले होऊ देणार नाही’ असा इशारा दिला. आता बिग बॉसचे निर्माते स्वामी ओमच्या या आरोपांना आणि इशारांना कितपत गंभीर घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
मात्र स्वामी ओमच्या हकालपट्टीमुळे शोचा होस्ट सलमान खानसह घरातील सर्वच सदस्य आनंददायी आहेत. स्वामी ओमला बिग बॉसने पुन्हा या शोमध्ये एंट्री देऊ नये हीच ते अपेक्षा करीत असावेत.