गेल्या सलमान खानच्या ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये लोकेशला प्रेक्षकांना पुन्हा बघण्याची संधी मिळाली. मात्र यावेळेस तिचा लूक खूपच डिफरंट होता. अर्थात प्रेक्षकांना आवडणारा होता. या लूकमधील तिचे काही फोटोज् सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
नव वर्षाच्या सुरुवातीलाच लोकेशकुमारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर यातील काही फोटोज् शेअर केले आहेत. नेटिझन्सकडून तिच्या या फोटोज्ना तुफान लाइक्स मिळत आहेत. तसेच तिचा डिफरंट लूकही पसंत केला जात आहे.
लोकेश जेव्हा ‘बिग बॉस’च्या शोमध्ये आली होती तेव्हा तिचा अॅटिट्यूट सलमान खानला खूपच आवडला होता. पुढे तिच्यातील क्युटनेसमुळे ती प्रसिद्धी झोतात आली होती. बिग बॉसने तिला परत बोलावून हे सिद्धही केले आहे. जेव्हा ती शोमध्ये आली तेव्हा तिने मनू आणि मनवीरचे भरभरून कौतुक केले. शोदरम्यान ती या दोघांच्या खूपच क्लोज होती.
बिग बॉसच्या घरातील लोकेशचा प्रवास मध्यावधीत संपणारा असला तरी, तिला मिळालेली प्रसिद्धी पाहता लोकेश लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर परतण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा ती दुसºयांदा बिग बॉसच्या शोमध्ये आली तेव्हा तिच्याबरोबर ‘कॉमेडी नाइट बचाव’चे कलाकारदेखील उपस्थित होते. तिने त्यांच्याबरोबर भरपूर इन्जॉय केला. त्याचबरोबर प्रक्षेकांचेही भरपूर मनोरंजन केले.