काही दिवसांपूर्वी एका स्पोर्ट्स चॅनलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर दीपक नेलवालसह लग्नामुळं रुप चर्चेत आली होती.या फोटोशूटमध्ये रुपनं कोणताही हॉट ड्रेस परिधान केलेला नाही. मात्र सेक्सी बॉडी कव्हर करतानाची तिची अदाही तितकीच मादक असल्याचं या फोटोशूटमध्ये दिसतंय.
हे फोटोशूट फक्त आवड म्हणून केल्याचा दावा रुपनं केलाय.. यामागं कोणतंही कारण करुन काहीतरी वेगळं करण्याच्या विचारानं फोटोशूट केल्याचं तिनं सांगितलंय.
बालिका वधू या मालिकेतील सांचीच्या भूमिकेसोबत रुपनं स्वरागिनी, बालवीर अशा मालिकांमध्येही काम केलंय. सध्या ती कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत काम करतेय. नताशा गुजराल नावाची भूमिका रुप साकारतेय.
सध्या टीव्ही अभिनेत्रीसुद्धा फोटोशूट करताना पाहायला मिळतायत. बोल्ड फोटोशूटच्या निमित्ताने कायम चर्चेत राहण्याकडे त्यांचा कल दिसून येतोय.