'अस्मिता' फेम अभिनेत्री मयुरी वाघ दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:21 IST
1 / 9शांत व मनमिळावू स्वभाव, आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी नायिका म्हणजे मयुरी वाघ. 2 / 9अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमधून अभिनय करत तिने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 3 / 9अस्मिता या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेमुळे आजही तिला ओळखलं जातं. 4 / 9अलिकडेच ती स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत पाहायला मिळाली.मात्र, मागील काही वर्षांपासून अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दुरावली होती. तसेच सोशल मीडियावरही फारशी सक्रीय नव्हती.5 / 9मात्र आता मयुरी वाघ पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत आहे.6 / 9नुकतेच मयुरी वाघने इंस्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोत तिने नेटेड व्हाइट टॉप परिधान केले आहे. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, टीका आणि लोकांच्या मतांची पर्वा नाही...7 / 9तिने जणू काही तिला ट्रोल करणाऱ्यांना पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. 8 / 9या फोटशूटमध्ये मयुरी वाघ खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.9 / 9मयुरी वाघच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'अस्मिता','आई एकविरा', 'वचन दिले तू मला', 'मेजवाणी' आणि 'सुगरण' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने बालकलाकार म्हणून 'उठी उठी गोपाळा' नाटकात काम केलं आहे.