Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी महांगडेची शेतात धमाल, लुटला स्ट्रॉबेरीचा आनंद! चाहत्यांना खास ऑफर देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:54 IST

1 / 10
मराठी कलाविश्वात आपल्या कसदार अभिनयाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
2 / 10
रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी अश्विनी खऱ्या आयुष्यात मात्र मातीशी नातं जपणारी 'शेतकऱ्याची लेक' आहे.
3 / 10
नुकतंच अश्विनीने तिच्या मामा-मामींच्या शेतातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 10
ताज्या स्ट्रॉबेरीचा आनंद घेताना आश्विनी दिसून येत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
5 / 10
यावेळी तिने पिवळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स असा अतिशय साधा पण मोहक लूक केला होता.
6 / 10
हे फोटो शेअर करताना तिने दिलेली कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अश्विनीने आपल्या चाहत्यांना चक्क मामाच्या शेतावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. तिने लिहिलंय, 'आमच्या मामा-मामींच्या शेतात यायचं हं!'.
7 / 10
अश्विनी महांगडेच्या मामाचे हे शेत पसरणी येथे आहे. पसरणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील गाव आहे.
8 / 10
अश्विनी महांगडे नेहमीच आपल्या कामातून वेळ काढत गावी जात असते. कधी शेतात राबताना, तर कधी ग्रामीण जीवनाचा आनंद घेतानाचे तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
9 / 10
सध्या अश्विनी महांगडे 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत काम करताना दिसते आहे. यापूर्वी ती 'आई कुठे काय करते' मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
10 / 10
अश्विनीने चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती 'महाराष्ट्र शाहीर', 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर - एक युग', 'बॉईज' या सिनेमात झळकली आहे.
टॅग्स :अश्विनी महांगडे