एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या या शाही विवाहसोहळ्यात सौरभ बग्गीमध्ये वरात घेऊन आला होता. सौरभने त्याच्या मित्रांबरोबर डान्स केला. दरवाजावर वरात आल्यानंतर अंकिताच्या आईने त्याला ओवाळून त्याचे स्वागत केले. त्यानंतर अंकिताची एंट्रीही बघण्यासारखी होती. अंकिताचा हातात हात घेऊन सौरभने तिला स्टेजवर नेले. त्यानंतर ‘तेरा होने लगा हूँ’ या गाण्याने वातावरणात रंगत निर्माण केली. पुढे दोघांनी एकमेकांना हार घातला.
‘जोधा अकबर’ या मालिकेत काम केलेल्या अंकिता चौधरी हिचा सौरभ शालेय मित्र आहे. अंकिता छोट्या पडद्यावर नशीब आजमावत असून, तो एका बॅँकेत मॅनेजर म्हणून काम करीत आहे. लहानपणीचे मित्र असलेल्या या दोघांचे लग्न घरच्यांच्या संमतीनेच करण्यात आले. लग्नानंतरही अंकिता टीव्ही मालिकांमध्ये काम करणार आहे.
विवाहातील काही छणचित्रे...