वंदना म्हणाली, आम्ही दोघांनी लग्नासाठी दोन वर्षे वाट बघितली. आम्ही एकमेकांसाठी अगदी परफेक्ट लाईफ पार्टनर आहोत. माझ्या आयुष्यात मला कुटुंबानंतर कोणी चांगले ओळखले असेल मला समजून घेतले असेल तर तो दुसरा अमन आहे. त्यामुळे माझ्या लाईफ पार्टनरची जागा ही अमनपेक्षा दुसरे कोणीही घेवू शकले नसते. आम्ही दोघेही एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर असेच आहोत.
अमन म्हणाला, माझ्या मते, एखाद्याने तेव्हाच लग्न करावे, जेव्हा दोघेही मनापासून लग्नासाठी अगदी तयार असतील. माझ्या लग्नासाठी हीच योग्य वेळ होती. वंदना माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला नशीबवान समजतोय. आम्ही दोघेही एकमेकांना गेल्या दोन वर्षापासून ओळखतोय. त्यामुळे एकमेंकांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती झाल्यात. इनफॅक्ट वंदना मला खूप समजून घेते तिनेच मला माझ्या आयुष्यात चांगली व्यक्ती बनवले आहे आणि मी ही वंदनासाठी मी पूर्ण बदललोय.
खरंतर , याचवर्षी म्हणजेच 20 एप्रिल 2016लाच त्यांचं लग्न होणार होतं. मात्र काही कारणास्तव हे लग्न पुढं ढकलण्यात आलं होतं. त्यामुळं दोघांच्या नात्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.एका मुलाखतीदरम्यान वंदनाशी असलेल्या नात्यात कोणतीही कटूता आली नसल्याचं खुद्द अमननेच स्पष्ट केले होते.