'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका का सोडली? ईशा केसकरने सांगितलं खरं कारण, म्हणाली-"जीवतोड मेहनत करुन सुद्धा…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:40 IST
1 / 8छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेची सध्या मालिका रसिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील अद्वैत-कलाची जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 2 / 8 मात्र, या मालिकेत एक ट्विस्ट पाहायाला मिळतोय. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून कला-अद्वैतचा लग्नसोहळा सुरू होता. मात्र, यादरम्यान कलाचा अपघात होतो. खरंतर, हा अपघात घडवून आणलेला असतो आणि यात अद्वैतची पत्नी आपला जीव गमावला असं दाखवण्यात आलं आहे.3 / 8 लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेत सुकन्या नावाच्या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. 4 / 8 त्यामुळे मागील काही दिवसांपासून मालिकेत कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकरने मालिकेतून एक्झिट घेतल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. या चर्चांवर उत्तर देत ईशाने मौन सोडलं आहे.5 / 8 अशातच नुकताच ईशा केसकरमे 'मुंटा' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, तिने प्रकृतीच्या कारणास्तव आपण मालिका सोडल्याचं स्पष्ट केलं आहे.6 / 8 यादरम्यान, डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे आपण मालिका सोडल्याचं तिने सांगितलं आहे. 'मुंटा' शी बोलताना ईशा म्हणाली, 'मी गेली दोन वर्ष सगल काम करत होते. जून महिन्यात माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी त्या अवस्थेतही शूटिंग करत होते. ही आणखी दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला. जर मी विश्रांती घेतली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. भविष्यात डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल.7 / 8 पुढे ईशा म्हणाली, ' त्यामुळे मी १५-२० दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यां गोष्टींचा विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं.' असं ईशाने यावेळी सांगितलं. 8 / 8यावेळी ईशा असंही म्हणाली की,'जीवतोड मेहनत करुन आपण पैसे कमावत असतो पण त्याचा उपभोग घेता येत नसेल तर काहीच उपयोग नाही. म्हणून थोडं थांबायचं ठरवलं. विश्रांतीनंतर मी पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे.'