PHOTOS : ‘आई कुठे काय करते’मधील ‘यश’ची पत्नी दिसते फारच सुंदर, पाहा स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 08:00 IST
1 / 10‘आई कुठे काय करते’ ही टीव्हीवरची लोकप्रिय मालिका. मालिकेतील अनिरूद्ध, अरुंधती, यश, आप्पा, आजी, अभि, ईशा सर्वच प्रेक्षकांचे लाडके. सध्या चर्चा आहे ती यशच्या बायकोची. होय, यशच्या रिअल लाईफ पार्टनर कृतिका देव हिची.2 / 10‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारतो आहे. यापूर्वी अभिषेकने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की अभिषेक देशमुखचं लग्न झालं असून त्याची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 3 / 10अभिषेक देशमुखच्या पत्नीचं नाव आहे कृतिका देव. अभिषेक आणि कृतिका 6 जानेवारी 2018 रोजी लग्न केले. सध्या कृतिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.4 / 10अभिनेत्री कृतिका देव मुळची पुण्याची आहे. एस.पी कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. ‘प्राईम टाईम’ मालिकेत तिने काव्या आपटेची भूमिका केली होती5 / 10कृतिकाने ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटात काम केलं होतं. ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटातही ती झळकली होती. प्रथमेश परब सोबत ‘प्रेम दे’ या सीरिजमध्ये देखील तिने काम केलं. ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा ती दिसली.6 / 10कृतिका सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती सतत शेअर करत असते. अभिषेकही बायकोसोबतचे अनेक फोटो सतत शेअर करताना दिसतो.7 / 10अभिषेक आणि कृतिका दोघांची एका नाटकाच्या दरम्यान मैत्री झाली. अभिषेक नाटक स्वत: लिहत होता आणि त्या नाटकाची तो तयारी करत होता. त्याच वेळी कृतिका हिची खूप मदत त्याला झाली. यादरम्यान दोघांची मैत्री झाली.8 / 10कृतिकाला ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मुंबईला जायचं होतं. तेव्हा अभिषेक तिच्याबरोबर गेला होता. ऑडिशननंतर कृतिका या चित्रपटासाठी सिलेक्शन सुद्धा झालं. यादरम्यान दोघांमधील मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं.9 / 10अभिनेता अभिषेक देशमुखने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेआधी ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत काम केलं होतं. यात त्याने पुनर्वसूची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.10 / 10याशिवाय ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. अभिषेकने वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.