By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:30 IST
1 / 8तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) प्रेक्षकांची सर्वात लाडकी अभिनेत्री. तिचं हसणं, लाजणं, अभिनय आणि सौंदर्याची कायमच स्तुती होत असते. 2 / 8तेजश्री किती सकारात्मक विचार करते आणि आयुष्याकडे बघण्याचा नवी दृष्टिकोन दाखवते हे अनेकदा तिच्या मुलाखतींमधून दिसलं आहे.3 / 8तेजश्री तिच्या एकंदरच पॉझिटिव्हिटीने सगळ्यांना आपलंसं करते. काही दिवसांपूर्वी तिचा 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमा रिलीज झाला. यातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.4 / 8सुबोध भावेसोबत तिची पहिल्यांदाच या सिनेमात जोडी जमली. दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली. नुकताच तेजश्रीला या सिनेमासाठी पुरस्कारही मिळाला आहे.5 / 8यानिमित्त तेजश्रीने खास पुरस्कार सोहळ्यासाठी केलेल्या आऊटफिटमध्ये फोटो शेअर केलेत. तसंच यासोबत तिच्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.6 / 8तेजश्री पुरस्कार सोहळ्यासाठी एकदम 'बॉस लेडी'च्या लूकमध्ये दिसत आहे. ब्लॅक लूक तिने मस्त फ्लॉन्ट केला आहे. ब्लॅक ब्लेजर, ब्लॅक पँट आणि मॅचिंग हील्स असा तिचा लूक आहे. तसंच तिने स्टायलिश नेकपीस घातला आहे. तोच पीस हातातही आहे.7 / 8तिची हेअरस्टाईलही साधी सरळ आहे. या लूकमध्ये तिच्या गोड स्माईलने तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. 'तुम्ही नेहमीच नव्याने सुरुवात करु शकता. आनंदी आयुष्य' असं कॅप्शन तिने दिलं आहे. 8 / 8तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारत होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने अचानक मालिका सोडली. तिला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. फोटो सौजन्य - tejashripradhan instagram