1 / 11आज ८ मे रोजी दहावी परीक्षेचा निकाल लागला आहे. कुणी चांगले गुण घेऊन पास झालंय. तर कुणी नापास झालंय. 2 / 11पण निकाल काहीही लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मार्कशिट तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'थलापती' आणि तमिळनाडूचा किंगमेकर अर्थात विजय. 3 / 11नुकताच विजयचा १०वीचा निकाल सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आज कोट्यवधींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारचा शैक्षणिक प्रवास कसा होता? जाणून घेऊया.4 / 11विजय अभ्यासात खूप हुशार किंवा 'टॉपर' नव्हता, तर तो एक सरासरी विद्यार्थी होता.5 / 11विजयने १९८९ मध्ये आपली १०वीची परीक्षा पूर्ण केली. विजयने त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चेन्नईतील फातिमा मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल आणि बाललोक मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल इथून पूर्ण केले. 6 / 11विजयच्या गुणपत्रिकेत सर्वात धक्कादायक आणि चर्चेचा विषय म्हणजे त्याचे गणितातील गुण. ज्या विजयने आज राजकारणात मोठमोठ्या धुरंधरांचे 'गणित' बिघडवून टाकले आहे, त्याला स्वतःला १०वीत गणितात सर्वात कमी गुण मिळाले होते.7 / 11 गणित हा त्यांचा सर्वात कमकुवत विषय ठरला. गणितात त्याला फक्त २०० पैकी ९५ गुण मिळाले होते. 8 / 11विजयनं गणित किंवा विज्ञानापेक्षा तमिळ आणि इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळवले होते. 9 / 11सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मार्कशिटनुसार विजयला दहावीत तमिळ: १५५/२००, इंग्रजी: १३३/२००, विज्ञान: २०६/३००, समाजशास्त्र: १२२/२००, गणित: ९५/२०० असे गुण मिळाले होते. 10 / 11१२वी पूर्ण केल्यानंतर विजयने चेन्नईच्या नामांकित लोयोला कॉलेजमध्ये 'व्हिज्युअल कम्युनिकेशन'साठी प्रवेश घेतला. मात्र, अभिनयाच्या ओढीमुळे त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले नाही. 11 / 11विजयनं औपचारिक पदवी पूर्ण केली नसली तरी चित्रपट क्षेत्रातील त्याच्या योगदानाची दखल घेत 'डॉ. एम.जी.आर. एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट'ने त्याला मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.