४ वर्षांतच मोडलं पहिलं लग्न, आता दुसऱ्या लग्नानंतर पोर्तुगालमध्ये पतीसोबत हनिमून एन्जॉय करतेय साऊथ अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:21 IST
1 / 7साऊथ अभिनेत्री दुसऱ्या लग्नानंतर सध्या हनिमून एन्जॉय करते आहे. पोर्तुगालमध्ये पतीसोबत अभिनेत्री व्हॅकेशनला गेली आहे. 2 / 7याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे समांथा रुथ प्रभू आहे. 3 / 7समांथाने नुकतंच दिग्दर्शक राजनिदी मोरूसोबत दुसरं लग्न करत संसार थाटला आहे. 4 / 7लग्नानंतर समांथा पतीसोबत लिस्बनला गेली आहे. तिथे ती क्वालिटी टाइम घालवत आहे. 5 / 7 समांथाने तिथल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आहेत. 'अशाप्रकारे डिसेंबर महिना गेला...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 6 / 7समांथाने १ डिसेंबर २०२५ रोजी राजनिदी मोरूसोबत लग्न करत नव्याने संसार थाटला आहे. 7 / 7याआधी तिने २०१७ साली नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. पण २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.