पत्नीला घटस्फोट देणारे प्रकाश राज पडले 'या' नृत्यदिग्दर्शिकेच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 16:06 IST
1 / 8दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता म्हणजे प्रकाश राज. 'सिंघम', 'हिरोपंती', 'जंजीर', 'पुलिसगिरी' आणि 'दबंग २' या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे दिग्गज कलाकारांच्या यादीत प्रकाश राज यांचं नाव कायमच घेतलं जातं. 2 / 8अभिनेता प्रकाश राज प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही कायमच चर्चेत असतात. प्रकाश राज यांनी दोन लग्न केली असून त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून काडीमोड घेतला आहे.3 / 8१९९४ मध्ये प्रकाश राज यांनी तामिळ अभिनेत्री ललिता कुमारी यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना मेघा आणि पूजा या दोन मुलीदेखील आहेत. त्यांना एक मुलगादेखील होता. मात्र, वयाच्या ५व्या वर्षी त्याचा अपघाती मृत्यू झाला.4 / 8मुलाच्या निधनानंतर प्रकाश राज व ललिता यांच्या नात्यात दुरावा आला. परिणामी २००९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ललितापासून विभक्त झाल्यावर प्रकाश राज यांनी २०१० मध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर पोनी वर्मासोबत लग्नगाठ बांधली.5 / 8पोनी वर्मा आणि प्रकाश राज यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. सुरुवातीच्या काळात प्रकाश राज यांच्या लेकी या लग्नासाठी तयार नव्हत्या. मात्र, पोनी यांनी भेटल्यावर त्यांनी प्रकाश- पोनी यांच्या लग्नाला संमती दिली.6 / 8मुलींच्या संमतीने पोनी आणि प्रकाश यांनी लग्न केलं. आज या दोघांना वेदांत नावाचा एक लहान मुलगादेखील आहे.7 / 8पोनी वर्मा आणि प्रकाश राज ही जोडी टॉलिवूडमधील सर्वात रोमॅण्टिक जोडीपैकी एक असल्याचं म्हटलं जातं.8 / 8पोनी वर्मा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका असून बऱ्याचदा ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूट आणि हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.