Join us  

Shri Krishna: टीव्हीवर या कलाकारांनी अजरामर केली श्रीकृष्णाची भूमिका, लोक आजही मानतात देव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:25 PM

1 / 6
देशभरात जन्माष्टमीचा सण गुरुवार आणि शुक्रवारी साजरा होणार आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने देशभरात कृष्ण भक्तीचा नेहमीप्रमाणे पूर येताना दिसणार आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अनेक धार्मिक आणि पौराणिक मालिकांमधून समोर आलं आहे. या मालिकांमधील काही कलाकारांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका आपल्यासमोर अजरामर केली आहे. अशाच काही कलाकारांचा घेतलेला आढावा.
2 / 6
बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका नितीश भारद्वाज यांनी केली होती. श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली होती. तसेच बीआर चोप्रा यांच्या विष्णू पुराण मालिकेमध्ये नितीश भारद्वाज यांनी विष्णू अवतारांच्या भूमिका केल्या होत्या. मात्र आजही त्यांना श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी ओळखतात.
3 / 6
रामानंद सागर यांची श्रीकृष्ण मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत सर्वदमन बॅनर्जी यांनी मोठ्या कृष्णाची भूमिका केली होती. बॅनर्जी यांचा मंद स्मितहास्य करणारा श्रीकृष्णही लोकांच्या नजरेसमोर आहे.
4 / 6
रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत कुमारवयीन कृष्णाची भूमिका करणाऱ्या स्वप्निल जोशी यांनीही या भूमिकेसाठी लोकप्रियता मिळवली होती. आजही श्रीकृष्ण मालिकेती स्वप्निल जोशी यांच्या भूमिकेची आठवण काढली जाते.
5 / 6
२०१३-१४ मध्ये टीव्हीवर पुन्हा एकदा महाभारत मालिकेचं पुनरागमन झालं होतं. या मा्लिकेत सौरभ जैन यांना या भूमिकेसाठी देशभरात प्रसिद्धी मिळाली होती.
6 / 6
राधा कृष्ण मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका सुमेध मुद्गलकर यांनी केली होती. या मालिकेत राधा-कृष्णाचं प्रेम नव्या रूपात दाखवण्यात आले होते.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीजन्माष्टमी