Join us

संगीता बिजलानी ते हेजल कीच! लग्नासाठी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी बदलला धर्म; पाहा त्यांची लग्नानंतरची नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 14:39 IST

1 / 6
शर्मिला टागोर: बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. १९६७ मध्ये शर्मिला आणि मन्सूर अली खान पतौडी यांची पहिली भेट झाली. या भेटीनंतर त्याची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
2 / 6
मन्सूर अली खान पतौडी यांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर शर्मिला यांचं मन जिंकलं आणि त्या लग्नासाठी तयार झाल्या. लग्नासाठी शर्मिला यांना धर्मांतर करावं लागलं. लग्नानंतर त्यांचं नाव बेगम आयेशा सुलताना असं ठेवण्यात आलं.
3 / 6
हेजल कीच - बॉडीगार्ड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या हेजल कीचने क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत लग्न केलं आहे. हेजल एक ब्रिटीश मॉडेल आहे.
4 / 6
युवराजसोबत लग्न करण्यापूर्वी हेजलने धर्मपरिवर्तन केलं असून आता तिचं नाव गुरबसंत कौर असं आहे.
5 / 6
संगिता बिजलानी - संगिता बिजलानीला ओळखत नाही असं म्हणणारा व्यक्ती क्वचितच एखादा असेल. बॉलिवूडमध्ये संगिता बिजलानी आणि सलमान खान यांचं प्रेमप्रकरण बरंच गाजलं होतं. मात्र, शेवटी संगिताने सलमानला सोडून क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याच्यासोबत लग्न केलं.
6 / 6
दोन मुलांचे वडील असलेल्या अझरुद्दीन यांनी पहिल्या पत्नीला नौरीनला घटस्फोट दिला आणि संगिताशी लग्न केलं. १९९६ मध्ये या जोडीने लग्न केलं. लग्नासाठी धर्म परिवर्तन केलेल्या संगिताचं नाव आयशा बेगम असं ठेवण्यात आलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २०१० मध्ये ते विभक्त झाले.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडशर्मिला टागोरयुवराज सिंग