Join us

IN PICS : सिनेमे फ्लॉप पण लाइफ जगते अलिशान, कोट्यावधींची मालकीन आहे शमिता शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:31 IST

1 / 9
शिल्पा शेट्टीनं अपार यश मिळवलं. पण तिच्या तुलनेत तिची बहीण शमिता शेट्टी काहीशी अपयशी ठरली. 2000 मध्ये ‘मोहब्बते’ चित्रपटातून शमिताने बॉलिवूड डेब्यू केला.
2 / 9
‘मोहब्बते’ हिट झाला पण शमिताची झोळी मात्र खाली राहिली. अर्थात पुढे ती काही चित्रपटात दिसली. पण आली तशी गायब झाली. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे, आज शमिताचा वाढदिवस. होय, शमिता आज तिचा 43 वा वाढदिवस साजरा करतेय.
3 / 9
दीर्घकाळ चित्रपटांपासून दूर असलेली शमिता अलीकडे ‘बिग बॉस 15’मध्ये दिसली. हा शो ती जिंकू शकली नाही. पण या शोद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र ती यशस्वी ठरली.
4 / 9
फॅशन डिझाईनिंगमध्ये डिप्लोमा केल्यानंतर शमिताने फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रासोबत काम केलं. मनीष मल्होत्रा यानेच शमिताला अ‍ॅक्टिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला आणि 2000 मध्ये ‘मोहब्बते’ सिनेमातून शमिता अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत आली.
5 / 9
यानंतर फरेब, जहर, कॅश अशा अनेक सिनेमात ती झळकली. पण बहिणीसारखं स्टारडम तिला मिळवता आलं नाही. चित्रपटांत डाळ शिजत नाही म्हटल्यावर शमिताने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला.
6 / 9
याच कारणामुळे तिने ‘बिग बॉस 3’मध्ये स्पर्धक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला होता. पण शिल्पाच्या लग्नामुळे शमिताला ‘बिग बॉस 3’ अर्ध्यावर सोडून घरी परतावं लागलं होतं.
7 / 9
‘बिग बॉस 3’ नंतर झलक दिखला जा आणि खतरों के खिलाडी अशा रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली. पण यापश्चातही शमिताला यशाने हुलकावणी दिली. आज शमिताची ओळख आहे, ती केवळ शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून.
8 / 9
भलेही चित्रपटांत शमिता शेट्टी अपयशी ठरली. पण ती कोट्यावधीची मालकीन आहे. रिपोर्टनुसार, तिची नेट वर्थ 1 ते 5 मिलियन डॉलर आहे. शमिता एक इंटिरिअर डिझाईनर आहे आणि अनेक ब्रँडच्या जाहिरातीही करते. यातून ती लाखोंची कमाई करते.
9 / 9
सध्या शमिता अभिनेता राकेश बापटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे कपल लवकरच लग्न करणार, असं मानलं जातंय. राकेशआधी आफताब शिवदासानी,उदय चोप्रा, हरमन बावेजा अशा अनेकांशी तिचं नाव जोडलं गेलं होतं.
टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूड