Shahid Kapoor : "मी एक दिवस लपून..."; शाहिद कपूरने लेकीमुळे सोडली अनेक वर्षांची 'ती' वाईट सवय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 16:23 IST
1 / 10अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने पहिल्यांदाच क्रिती सेननसोबत स्क्रीन शेअर केली आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली आहे. 2 / 10शाहिदचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. याच दरम्यान शाहिद पत्नी मीरा आणि दोन मुलांसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. एका मुलाखतीत, अभिनेत्याने स्मोकिंग करणं नेमकं कसं सोडलं होतं ते सांगितलं आहे. 3 / 10'कबीर सिंह' फेम अभिनेत्याने नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' शोमध्ये खुलासा केला की तो स्मोकिंग करायचा पण आता त्याने ते सोडलं आहे. 'मी जेव्हा स्मोकिंग करायचो तेव्हा मी माझ्या मुलीपासून लपून सिगारेट ओढायचो. किंबहुना म्हणूनच मी ते सोडलं.' 4 / 10'एक दिवस जेव्हा मी लपून स्मोकिंग करत होतो तेव्हा मी स्वतःला सांगितलं की मी हे कधीच करणार नाही. खरं तर त्याच दिवशी मी स्मोकिंग सोडण्याचा निर्णय घेतला कारण मला ते माझी मुलगी मीशापासून लपवायचं नाही'5 / 10शाहीद कपूरने 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्न केलं होतं आणि ते एक अरेंज मॅरेज होतं. ही बॉलिवूडची सर्वात आवडती जोडी आहे. शाहिद आणि मीरा यांना दोन मुलं आहेत. 6 / 10शाहिदची मुलगी मीशा 7 वर्षांची आहे, तर मुलगा झैन कपूर चार वर्षांचा आहे. शाहिद अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतानाचे फोटो शेअर करतो, जे चाहत्यांना खूप आवडतात.7 / 10शाहिद कपूरचा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहिदने एका सायंटिस्टची भूमिका साकारली आहे, जो क्रिती सेनॉन साकारत असलेल्या रोबोट सिफ्रा या पात्राच्या प्रेमात पडतो. ही प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. 8 / 10चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने 107 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. शाहिद लवकरच 'देवा' मध्ये दिसणार आहे, जो 11 ऑक्टोबर 2024 रोजी पडद्यावर येणार आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे.9 / 1010 / 10