PHOTOS : ‘मन्नत’ बाहेर हजारोंची गर्दी, मध्यरात्री असा साजरा झाला ‘किंगखान’ शाहरुखचा वाढदिवस...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 10:31 IST
1 / 11किंगखान शाहरुख खानचा आज वाढदिवस. किंगखानचा वाढदिवस म्हटल्यानंतर ‘मन्नत’बाहेर गर्दी जमणार नाही, हे शक्यचं नाही. 2 / 11 दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले.3 / 11यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर अक्षरश: दिवाळी साजरी केली. फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली.4 / 11चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी बॉलिवूडचा बादशाह बाल्कनीत आला आणि त्यांनी चाहत्यांना हात जोडून अभिवादन केलं.5 / 11चाहत्यांचं प्रेम पाहून शाहरूख भारावून गेला. छोटा अबरामही त्याच्यासोबत होता. यावेळी एसआरकेने आपल्या मोबाईलमधून फॅन्ससोबत सेल्फी सुद्धा घेतली.6 / 11गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे शाहरूला चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करता आला नव्हतो. मात्र यावेळी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर एकच गर्दी केली.7 / 11शाहरूख बाल्कनीत येताच आपल्या या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तो क्षण बघण्यासारखा होता. 8 / 11 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत जन्मलेल्या शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवला आणि यानंतर तो चित्रपटांकडे वळला.9 / 11रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट दीवाना होता. यानंतर डर, अंजाम आणि बाजीगर सारख्या काही चित्रपटांमध्ये त्याने नकारात्मक भूमिका केल्या.10 / 11 राजू बन गया जेंटलमन आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी, डुप्लिकेट, देवदास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, माय नेम इज खान आणि चक दे सारख्या चित्रपटांमधून शाहरूख घराघरात पोहोचला. 11 / 11शाहरुख खानने रईस आणि डॉन सारख्या चित्रपटातही क्राइम गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.