Join us

मराठी मालिकाविश्वातील 'ही' अभिनेत्री आहे कराटे चॅम्पियन, पटकावला ब्लॅक बेल्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:54 IST

1 / 7
मराठी मनोरंजन विश्वातील ही अभिनेत्री सध्या चांगलीच लोकप्रिय आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राप्ती रेडकर.
2 / 7
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत प्राप्ती रेडकर उत्कृष्ट अभिनय करुन प्रेक्षकांंचं मन जिंकतेय. प्राप्ती रेडकर रिअल लाईफमध्ये कराटे चॅम्पियन आहे.
3 / 7
प्राप्ती रेडकरने अलीकडेच एका कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत चांगली कामगिरी केली. इतकंच नव्हे प्राप्तीने ब्लॅक बेल्ट पटकावला अशी चर्चा आहे.
4 / 7
अभिनय क्षेत्रात सक्रीय असलेल्या प्राप्तीला किक बॉक्सिंग आणि कराटेचीही चांगली आवड आहे.
5 / 7
२०२१ मध्ये प्राप्तीने किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. अभिनयासोबत खेळातही यशस्वी कामगिरी करणाऱ्या अभिनेत्री तशा दुर्मिळच.
6 / 7
प्राप्ती रेडकर तिच्या स्पोर्ट्स ग्रुपसोबत विविध कराटे स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असते. प्राप्तीच्या व्यक्तिमत्वातील हा विशेष गुण पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलंय.
7 / 7
कराटे चॅम्पियन असेलली प्राप्ती रेडकर सध्या झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत उत्कृष्ट अभिनय करत आहे. प्राप्तीने मालिकेत साकारलेल्या 'सावली' या भूमिकेने सर्वांचं मन जिंकलंय.
टॅग्स :टेलिव्हिजनझी मराठी