बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या हस्ते भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मात्र सलमान खान त्याचा आगामी चित्रपट ‘ट्यूबलाईट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो उपस्थित राहू शकला नाही. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून अभिनेत्री डेजी शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री डेझी शाह, एली अवराम, अॅमी जॅक्सन आदी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.
तसेच बाप्पाला निरोप देण्यासाठी सलमानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलविरा उपस्थित होत्या. त्याचबरोबर अॅमी जॅक्सनने यावेळी ढोल-ताशाच्या तालावर डांस केले. सलमान खानची बहीण अर्पिता खाननेही नृत्य करून बाप्पाला निरोप दिला. सलमानचे वडील सलीम खान यांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली.