Join us

'तेरे नाम' सिनेमातील 'ही' गोष्ट सलमानने आजही स्वतःजवळ ठेवली आहे, २२ वर्षांनी झाला खुलासा

By देवेंद्र जाधव | Updated: July 18, 2025 14:06 IST

1 / 7
'तेरे नाम' सिनेमा खूप गाजला. या सिनेमातील सलमानचा रफ अँड टफ लूक आणि अँग्री यंग मॅन अंदाज सर्वांना चांगलाच पसंत पडला.
2 / 7
'तेरे नाम' सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. या सिनेमातील सलमान खान आणि भूमिका चावला या दोघांची जोडीही चांगलीच गाजली. 'तेरे नाम' सिनेमातील एक खास गोष्ट सलमानने जपून ठेवलीय
3 / 7
सलमान खान वरवर दबंग जरी वाटत असला तरीही आतुन किती हळवा आहे, याचा अनुभव नुकताच आला. 'तेरे नाम' सिनेमातील एक खास गोष्ट भाईजानने जपून ठेवली आहे.
4 / 7
२२ वर्षांनी सलमानने याविषयी खुलासा केला. सलमानने त्याच्या कोणत्या सिनेमाची आठवण जपून ठेवली आहे का? तेव्हा सलमान म्हणाला, तेरे नाम सिनेमात मी जी बाईक वापरली होती ती आजही माझ्याजवळच आहे
5 / 7
सलमानने दिलेल्या उत्तराने सर्वजण चकीत झाले. सलमानला बाईकचं प्रचंड वेड आहे. त्यामुळेच त्याने 'तेरे नाम' सिनेमात जी स्पोर्टस बाईक वापरली होती. ती जपून ठेवलीय
6 / 7
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, २०२५ मध्ये सलमान खानचा सिकंदर हा सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला
7 / 7
सलमान खान सध्या गलवान घाटी युद्धावर आधारीत बॅटल ऑफ गलवान सिनेमाच्या तयारीत आहे. अपूर्व लाखिया या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसतीश कौशिकभूमिका चावला