Join us

रितेश देशमुखला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे त्यांची 'वेड' लावणारी लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 14:04 IST

1 / 14
सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा-देशमुख. सध्या हे कपल खूप चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. नुकताच त्यांचा वेड चित्रपट रिलीज झाला आहे.
2 / 14
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतो आहे. वेड चित्रपटातून जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
3 / 14
रितेश व जिनिलियाची जोडी जवळपास २० वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहायला मिळाली.
4 / 14
रितेश आणि जिनिलियाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि तिथूनच त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली होती. पण जिनिलियाचं रितेशला भेटल्यावर त्याच्याबद्दलचे मत चांगले नव्हते.
5 / 14
२००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात या रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र त्यावेळी रितेशबद्दल जिनिलियाचे मत चांगले नव्हते.
6 / 14
कारण, तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता. त्यामुळे गर्विष्ठ असेल, असे जिनिलियाला वाटले होते. त्यामुळे पहिल्या भेटीतच जिनिलियाने रितेशकडे दुर्लक्ष केले होते आणि रितेशला तिचे हे वागणे पटले नव्हते.
7 / 14
त्यावेळी जिनिलीया होती १६ वर्षांची तर, रितेश २४ वर्षांचा.
8 / 14
रितेशने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर जिनिलियाने त्याच्याशी हात मिळविला. मात्र तिचे लक्ष इकडे-तिकडेच होते. खरंतर जिनिलियाचे हे वागणे रितेशला काही पटले नव्हते. मात्र चित्रपटात काम करता करता ते एकमेकांना समजू लागले.
9 / 14
त्यांच्यात चांगली मैत्री झाली. चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना समजले नाही.
10 / 14
चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर रितेश ज्यावेळी घरी परत आला तेव्हा त्याला सतत जिनिलियाची आठवण येत होती. मात्र एखाद्या मुलीला लगेच फोन करणे योग्य वाटत नसल्यामुळे तो तिला फोन करायचं टाळत होता.
11 / 14
दुसरीकडे जिनिलियालादेखील रितेशची आठवण येत होती. परंतु हेच प्रेम आहे याची जाणीव त्यांना त्यावेळी झाली नव्हती.
12 / 14
तुझे मेरी कसमनंतर या दोघांनी मस्ती या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले. त्यानंतर त्यांचे नाते अधिक फुललं
13 / 14
तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.
14 / 14
रितेश आणि जिनिलियाला रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत.
टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा