Join us

लाजरान साजरा मुखडा..! रिंकू राजगुरूचा साडीतील मराठमोळा अंदाज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 20:42 IST

1 / 9
सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे.
2 / 9
ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 9
तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. रिंकूने शिवजंयतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
4 / 9
रिंकूने मराठमोळ्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5 / 9
तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता... शिवजयंतीच्या शुभेच्छा...
6 / 9
रिंकूची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना आवडत आहे. केवळ एका तासांत नऊ हजाराहून अधिक लाईक्स या पोस्टला मिळाल्या आहेत.
7 / 9
रिंकू राजगुरूच्या व्हिडीओसोबत तिने फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना भावतो आहे.
8 / 9
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.
9 / 9
या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.
टॅग्स :रिंकू राजगुरूअमिताभ बच्चन