Join us

Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 11:51 IST

1 / 10
रणवीर सिंग त्याच्या फॅशन सेन्समुळे सतत चर्चेत असतो. त्याचा मस्तमौला अंदाज चाहत्यांनाही भावतो. पण सध्या रणवीर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, रणवीर एका वयोवृद्ध चाहतीला भेटला. भेटलाच नाही तर अतिशय प्रेमाने त्याने तिची विचारपूस केली.
2 / 10
काल पिवळ्या रंगाच्या Lamborghini मधून रणवीर फिल्म डबिंगसाठी स्टुडिओत आला होता. स्वत: चालवत तो स्टुडिओत आला. काम संपवून परतीच्या वाटेवर पापाराझी त्याची वाट पाहत ताटकळत होते.
3 / 10
रणवीरने पापाराझींना मस्तपैकी पोज दिल्यात. याचदरम्यान मागून कुणीतरी आपल्याला आवाज देत असल्याचे त्याला वाटले. त्याने मागे वळून पाहिले तर एक आजीबाई रणवीरला बोलवत होत्या.
4 / 10
रणवीरची खूप मोठी चाहती असलेली ही आजीबाई खिडकीतून अभिनेत्याला साद घालत होती. तिचा आवाज ऐकून रणवीर लगेच खिडकीकडे धावला.
5 / 10
या आजीशी रणवीरने काही क्षण मस्तपैकी खिडकीबाहेर उभे राहून गप्पा मारल्या आणि शिवाय निरोप घेताना तिच्या हाताचे चुंबन घेऊन तिचे आशीर्वादही घेतले.
6 / 10
या सुंदर भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासाठी चाहते रणवीरचे कौतुक करत आहेत.
7 / 10
रणवीरची यॅलो कलरची लेम्बोर्गिनी कारही चर्चेत आहेत. रणवीर ही अलिशान कार स्वत: ड्राईव्ह करताना दिसला.
8 / 10
रणवीरकडे अशीच लाल रंगाची लेम्बोर्गिनी आहे. ही यॅलो कार कदाचित रोहित शेट्टीची असावी. कारण रोहितकडे अशीच यॅलो रंगाची लेम्बोर्गिनी आहे.
9 / 10
यावेळी रणवीरने ब्लॅक कलरची टी-शर्ट, त्यावर डेनिम जॅकेट कॅरी केला होता. त्याचा हेअरबँड, सनग्लासेज आणि मास्कही खास होता.
10 / 10
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणवीरचा ‘83’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या सिनेमात बिझी आहे.
टॅग्स :रणवीर सिंग