Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका, या बॉलिवूड ललनांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:48 IST

नुकताच ग्रॅमी अवार्ड्स सोहळा पार पडला. सर्वाधिक चर्चा झाली ती प्रियंका चोप्राच्या ड्रेसची.

नुकताच ग्रॅमी अवार्ड्स सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यातील पुरस्कारांची कमी, अन् कलाकारांच्या कपड्यांची अधिक चर्चा झाली. सर्वाधिक चर्चा झाली ती प्रियंका चोप्राच्या ड्रेसची. प्रियंका असा काही बोल्ड ड्रेस घालून या अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर उतरली की, सगळेच थक्क झालेत. साहजिकच देसी गर्लचा ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमधील हा बोल्ड अवतार भारतीय चाहत्यांच्या पचनी पडला नाही आणि त्यांनी प्रियंकांला ट्रोल करायला सुरुवात केली.

भारतीय सभ्येतेचे धडे देत अनेकांनी सोशल मीडियावर प्रियंकाला ट्रोल केले. पण प्रियंकाचा हा लूक इतकाही नवा नव्हता. अनेक वर्षांपासून हा ट्रेंड सुरु आहे. केवळ हॉलिवूडमध्ये नाही तर बॉलिवूडमध्येही.

20 वर्षांआधी जेनिफर लोपेजने बेंबी दिसेल असा ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेस घालून संपूर्ण जगाला धक्का दिला होता.  जंगल प्रिंटचा ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेस घालून जेनिफर रॅम्पवर उतरली होती. तिची ही बोल्ड चॉईस बघून सगळे थक्क झाले होते. पुढे हाच ‘प्लंजिंग नेकलाईन’ सेलिब्रिटी ललनांसाठी ट्रेंड बनला.

बॉलिवूडमध्येही ‘प्लंजिंग नेकलाईन’चा ट्रेंड लोकप्रिय आहे. करिना कपूरपासूनदीपिका पादुकोण, मलायका अरोरा ते बॉलिवूडमध्ये नवख्या असणा-या जान्हवी कपूरपर्यंत सर्वांनीच अतिशय आत्मविश्वासाने हा ट्रेंड फॉलो केला आहे. त्याचेच काही फोटो, खास तुमच्यासाठी....

टॅग्स :प्रियंका चोप्रादीपिका पादुकोणकरिना कपूर