Join us  

Pooja Sawant Engagement : अखेर पूजा सावंतच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 7:55 PM

1 / 8
अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्रीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 8
पूजा सावंतने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत १६ फेब्रुवारीला एंगेजमेंट केल्याचे सांगितले.
3 / 8
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
4 / 8
पूजाने साखरपुड्यादरम्यान हिरव्या रंगाची पैठणी साडी, नाकात नथ, हार असा लूक केला होता.
5 / 8
तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता.
6 / 8
पूजा सावंतच्या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
7 / 8
पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.
8 / 8
पूजा सावंतने दगडी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलेय. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.
टॅग्स :पूजा सावंत