शोभितामुळे झाला नागा चैतन्य-समांथाचा घटस्फोट? अभिनेता म्हणाला- "ती माझ्या आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:30 IST
1 / 8नागा चैतन्य आणि समांथा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं होतं. पण, २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. 2 / 8समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतन नागा चैतन्यने काही महिन्यांपूर्वीच शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने संसार थाटला.3 / 8त्यामुळे नागा चैतन्य आणि शोभितालाही ट्रोल केलं गेलं होतं. याशिवाय समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटासाठी शोभिता जबाबदार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. 4 / 8या चर्चांना आता नागा चैतन्यने उत्तर दिलं आहे. आणि शोभितासाठी वाईट वाटत असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे. 5 / 8'मला शोभितासाठी खूप वाईट वाटतं. तिची यात काहीच चूक नव्हती. ती माझ्या आयुष्यात सहज आली. आणि त्यानंतर आमचं नातं हळूहळू पुढे गेलं'.6 / 8'माझ्या भूतकाळाशी तिचा काहीही संबंध नाही. मी खरं तर तिचे सगळ्या गोष्टींसाठी आभार मानले पाहिजेत.तिने खूप मॅच्युरिटी दाखवली'. 7 / 8'या सगळ्याला सामोरे जाणं ही सोपी गोष्ट नाही. शोभिता माझ्यासाठी खरी हिरो आहे'. 8 / 8'तुम्हाला एक हेल्दी रिलेशनशिप हवं असतं. प्रेम म्हणजे माझ्यासाठी सगळं काही आहे.