Join us  

कचराकुंडीत सापडलेल्या चिमुकलीला 'मिथून दा'नी दिलं स्वत:चं नाव, 'ती' आज आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:21 AM

1 / 8
बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना बेस्ट' डिस्को डान्सर' म्हणून ओळखलं जातं. 45 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी हिंदी तसेच बंगाली सिनेमांमध्ये काम केले. मिथून हे केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहेत.
2 / 8
मिथून चक्रवर्ती यांनी 1979 साली योगिता बालीशी लग्नगाठ बांधली. त्यांना तीन मुलं आणि आणि एक मुलगी आहे. महाक्षय, नमाशी, उश्मे आणि दिशानी अशी त्यांची नावं. पण तुम्हाला माहितीए का मुलगी दिशानीला त्यांनी दत्तक घेतलेले आहे.
3 / 8
दिशानीची ही कहाणी खूपच हृदयद्रावक आहे. दिशानी अगदी काही महिन्यांची असताना अज्ञात पालकांनी तिला कचराकुंडीत फेकले होते. ही बातमी तेव्हा बंगाली वृत्तपत्रात छापून आली होती. मिथून चक्रवर्ती यांनी ही बातमी वाचली आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
4 / 8
त्या चिमुकलीबद्दल त्यांनी चौकशी केली. याविषयी त्यांनी पत्नी योगिताला सांगितले. मग दोघांनी कायदेशीररित्या त्या चिमुकलीला दत्तक घ्यायचे ठरवले. अगदी थाटमाटात तिला घरी आणले आणि 'दिशानी' असे तिचे नामकरण केले.
5 / 8
दिशानी केवळ आईवडिलांची नाही तर तिच्या तिनही भावांची लाडकी बनली. त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. आता दिशानी मोठी झाली आहे. तिने न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीमधून सिनेमाचं प्रशिक्षण घेतलं आहे.
6 / 8
दिशानीने आतापर्यंत दोन शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. 'होली स्मॉक' आणि 'अंडरपास' या लघुपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे.
7 / 8
असं म्हणतात, दिशानीने 'स्टुडंट ऑफ इयर'साठी ऑडिशन दिले होते. मात्र तिची निवड झाली नाही. दिशानी सलमान खानची खूप मोठी चाहती आहे. तिला सलमानसोबत काम करण्याची खूप इच्छा आहे.
8 / 8
दिशानी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या मित्रपरिवारासोबत ती अनेक फोटो पोस्ट करते. तसेच कुटुंबासोबतही तिचे अनेक फोटो आहेत. तिच्या फोटोंमधून वडील मिथून चक्रवर्ती यांच्यासोबतचा तिचा खास बॉंड दिसून येतो.
टॅग्स :मिथुन चक्रवर्तीपरिवारबॉलिवूड