Join us  

'अप्पी आमची कलेक्टर' फेम आर्याला ओळखलं का? यापूर्वी केलंय 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' मध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 2:54 PM

1 / 8
छोट्या पडद्यावर अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या बरीच गाजत आहे. या मालिकेत जवळपास ७ वर्षांचा लीप घेण्यात आला आहे.
2 / 8
या मालिकेत अनेक नवनवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे आर्या.
3 / 8
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुनची सहकारी म्हणून आर्या या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.
4 / 8
सध्या नेटकऱ्यांमध्ये आर्याची चर्चा होतीये. आर्याचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना बराच भावला आहे.
5 / 8
आर्याची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
6 / 8
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अभिनेत्री श्रद्धा मांगले ही आर्याची भूमिका साकारत आहे.
7 / 8
श्रद्धाने या मालिकेपूर्वी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
8 / 8
बाळू मामाच्या नावाने चांगभलं या मालिकेतही ती झळकली आहे. या मालिकेत तिने कुसुम ही भूमिका साकारली होती.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीनाटक