By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:56 IST
1 / 7सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. 2 / 7या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंचनाळे तसेच शुभांगी गोखले यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते आहे. 3 / 7'प्रेमाची गोष्ट' मध्ये तिने सावनी नावाचं पात्र साकारलं आहे. 4 / 7अलिकडेच या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ही मालिक एका रंजक वळणावर आहे. 5 / 7त्यामध्ये सावनी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. हर्षवर्धनसोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. 6 / 7अशातच तिच्या हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपूर्वा नेमळेकरने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे सुंदर फोटो पोस्ट केलेत.7 / 7'कुछ तुम्हारी निगाह काफिर थी, कुछ मुझें भी खराब होना था' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. अपूर्वाने 'आभास हा, 'तू माझा सांगाती', 'प्रेम हे' यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.