Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील या दोघांना ओळखलं का? आज आहेत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरे, प्रेक्षकांचे लाडके कलाकार

By देवेंद्र जाधव | Updated: May 7, 2026 17:56 IST

1 / 7
फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्यांना ओळखलं का? नीट बघा. या दोघांचंही कुटुंब आज मराठी मनोरंजन विश्वात चांगलंच सक्रीय आहे.
2 / 7
२००६ साली आलेल्या यंदा कर्तव्य आहे या मराठी सिनेमात हे दोघे झळकले होते. आता हे दोघेही मोठे झाले असून प्रेक्षकांचे लाडके कलाकार आहेत. बघूया तर कोण आहेत ते
3 / 7
फोटोत दिसणार मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे सोहम बांदेकर. तर फोटोत दिसणारी क्यूट मुलगी आहे अभिनेत्री सना शिंदे.
4 / 7
सना शिंदे ही सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते केदार शिंदे यांची मुलगी आहे. सनाने काही वर्षांपूर्वी आलेल्या महाराष्ट्र शाहीर सिनेमातून अभिनय क्षेत्रात खऱ्या अर्थाने पदार्पण केलं.
5 / 7
तर दुसरीकडे सोहमचे बाबा आदेश बांदेकर हे सुद्ध प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते आहेत. सोहमची आई सुचित्रा बांदेकरही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सोहम सुद्धा अभिनेता असून तो लक्ष्य या मालिकेत काम करतोय.
6 / 7
सोहम आणि सना या दोघांनीही लहान असताना यंदा कर्तव्य आहे या सिनेमात छोटीशी भूमिका साकारली होती. दोघांनी आता मोठं होऊन मनोरंजन विश्वात नाव कमावलंय
7 / 7
सोहम बांदेकरचं नुकतंच अभिनेत्री पूजा बिरारी सोबत लग्न झालं. सोहम वडिलांच्या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी सांभाळताना दिसतो. तर सना शिंदे सुद्धा वडील केदार शिंदेंना दिग्दर्शनात साहाय्य करताना दिसते.
टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटआदेश बांदेकरकेदार शिंदेसेलिब्रिटी