लक्ष्याच्या या नायिकेनं कायमचा सिनेइंडस्ट्रीला ठोकला रामराम, आयटी कंपनीत आहे कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:29 IST
1 / 7सिनेइंडस्ट्रीत बरेच असे कलाकार आहेत, जे प्रसिद्धी झोतात आले. पण जास्त काळ सिनेइंडस्ट्रीत टिकू शकले नाही. अशीच एक सुप्रसिद्ध नायिका जिने लक्ष्मीकांत बेर्डें यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. पण ही अभिनेत्री काही वर्षांनी इंडस्ट्रीतून गायब झाली. 2 / 7या अभिनेत्रीने कायमचाच सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकला. ही अभिनेत्री म्हणजे तेजश्री. जिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आम्ही दोघं राजा राणी या सिनेमात काम केले होते. या चित्रपटातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 3 / 7१९८६ साली कमलाकर तोरणे निर्मित आणि दिग्दर्शित ‘आम्ही दोघं राजा राणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका होती तेजश्री. त्यांच्यावर चित्रित झालेलं ‘मी प्रेम नगरचा राजा…’ हे गाणं आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर रुळताना दिसते.4 / 7घारे डोळे, मॉडर्न कपडे यामुळे ही नायिका त्यावेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसली. या चित्रपटानंतर तेजश्रीने शुभ बोल नाऱ्या या आणखी एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे सोबत सहाय्यक म्हणून काम केले. 5 / 7अभिनेत्री तेजश्रीने फेका फेकी आणि मज्जाच मज्जा या दोन चित्रपटातून विरोधी भूमिकाही साकारली. 6 / 7अभिनेत्रीचे पुण्यातील भरत नाट्यमंदिरा जवळ स्वतःचे ब्युटीपार्लर देखील होते. आपला पार्लरचा व्यवसाय सांभाळत ती चित्रपट आणि नाटकात देखील काम करायची. 7 / 7लग्नानंतर अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीतून संन्यास घेतला आणि आयटी क्षेत्रात मोठ्या पोस्टवर काम देखील केले. अगदी २०१६ साली देखील ती एका मोठ्या आयटी कंपनीत कार्यरत होती, असे सांगितले जाते.