रिशी जर अभिनेता नसता तर तो क्रिकेटर झाला असता.
अभिनेते पंकज कपूर आणि मोहन जोशी हे रिशीचे इनस्पिरेशन आहेत आणि सगळ्यांकडून रिशी काही ना काही शिकत असतो.
खाण्यावरती संयम आणि जेवढा वेळ मिळेल त्यात व्यायाम करणं हा रिशीचा फिटनेस फंडा आहे.
गायक ‘नुसरत फतेह अली खान’ यांची सगळी गाणी रिशीच्या गाण्याच्या प्लेलिस्टमध्ये टॉपला असतात.
‘सीके समर’ हा रिशीचा आवडता परफ्युम ब्रॅण्ड आहे.
अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत काम करायाला रिशीला आवडेल.
रिशीला लाडाने ‘चिंटू’ म्हणतात.
रिशी हा प्राणीमित्र आहे आणि त्याला मांजर, कुत्रे आवडतात.
स्टायलिश रिशीला वेस्टर्न फॉर्मल्स घालायला आवडतात.