Join us  

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींचं इतकं झालं वय, तरीदेखील अद्याप आहेत अविवाहित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 7:00 AM

1 / 10
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या अजूनही अविवाहित आहेत. यात एका अभिनेत्रीने चाळीशी ओलांडली आहे. तरीदेखील ती सिंगल आहे.
2 / 10
प्राजक्ता माळी अलीकडेच रिलीज झालेल्या रान बाजार या वेब सिरीजमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ मध्ये जन्म झाला. सध्या ती ३२ वर्षांची आहे.
3 / 10
गौतमी देशपांडेचा जन्म ३१ जानेवारी १९९२ ला झाला. गौतमी ही ३० वर्षांची आहे. गौतमी अजूनही अविवाहित आहे.
4 / 10
आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मुक्ता बर्वेचा जन्म १७ मे १९७९ रोजी झाला आहे. सध्या ती अविवाहित असून तिचे वय ४३ वर्ष आहे.
5 / 10
सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिने चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. श्रिया हिचा जन्म २३ एप्रिल १९८९ रोजी झाला आहे. तिचे वय ३३ वर्ष आहे.
6 / 10
शर्मिला शिंदे ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शर्मिलाचा जन्म ५ एप्रिल १९८७ रोजी झाला आहे. सध्या ती ३५ वर्षांची आहे.
7 / 10
जुई गडकरीने देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जुईचा जन्म ८ जुलै १९८८ मध्ये झाला आहे. ती सध्या ३४ वर्षाची आहे.
8 / 10
सुरुची आडारकर हिने मालिकेत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सुरुचीचा जन्म २३ एप्रिल १९८८ मध्ये झाला आहे. सध्या ती ३४ वर्षांची आहे.
9 / 10
समृद्धी केळकर ही देखील मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. फुलाला सुगंध मातीच्या या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचा जन्म २३ डिसेंबर १९९५ रोजी झाला आहे. सध्या २६ वर्षाची आहे.
10 / 10
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. ज्ञानदा रामतीर्थकर हिचा जन्म २६ जून १९९६ मध्ये झाला. ती सध्या २५ वर्षाची आहे.
टॅग्स :मुक्ता बर्वेप्राजक्ता माळीशर्मिला राजारामसुरुची आडारकरजुई गडकरी