Join us

शूटिंगदरम्यान या मराठमोळ्या अभिनेत्रीवर झाला होता बलात्काराचा प्रयत्न, आता कुठेय ही अभिनेत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:14 IST

1 / 8
अर्चना जोगळेकर हे नव्वदच्या दशकातील त्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे जी केवळ अभिनयासाठीच नाही तर नृत्यकौशल्यासाठीही खूप लोकप्रिय होती. अर्चनाने त्या काळातील अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.
2 / 8
किस्सा शांती का, कर्णभूमी आणि फूलवती इत्यादी. या टीव्ही सीरियल्समुळे अर्चना लोकांमध्ये एक प्रसिद्ध चेहरा बनली होती. केवळ हिंदीतच नाही, तर अर्चना जोगळेकर यांनी प्रादेशिक सिनेमांमध्येही काम केले.
3 / 8
आज आम्ही तुम्हाला ९०च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याची बरीच चर्चा झाली होती.
4 / 8
वास्तविक ही संपूर्ण घटना उडिया चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९९७ मध्ये अर्चना एका उडिया चित्रपटाचे शूटिंग करत असताना एका व्यक्तीने अभिनेत्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.
5 / 8
मात्र, अर्चना योग्य वेळी त्या व्यक्तीच्या तावडीतून निसटली आणि कशीतरी स्वत:ला सावरली. त्याच वेळी, त्या व्यक्तीला लोकांनी पकडले, ज्याला नंतर १८ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
6 / 8
अभिनेत्रीने तिची आई आशा जोगळेकर यांच्याकडून नृत्य शिकले.
7 / 8
आशा जोगळेकर स्वत: एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना असून, मुलगी अर्चनाच्या नावाने त्या मुंबईत 'अर्चना नृत्यालय' चालवतात.
8 / 8
तथापि, वृत्तानुसार, अर्चनाने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना बॉलिवूडला अलविदा केला आणि आता ती 'न्यू जर्सी' अमेरिकेत राहते आणि तिथे तिचा डान्स क्लास चालवते, जिथे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देते.