Join us

'किल्ला'मधील बालकलाकार आता दिसतो खूपच हॅण्डसम, अभिनयातून घेतला संन्यास, लंडनमध्ये करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:08 IST

1 / 8
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'किल्ला' सिनेमा लहान मुलांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट खूपच खूपच गाजला होता. हा चित्रपट रिलीज होऊन आज जवळपास १० वर्ष होऊन गेली आहेत. तरीही आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जुन पाहतात.
2 / 8
अभिनेत्री अमृता सुभाष आणि बालकलाकार अर्चित देवधर, पार्थ भालेराव अशी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळाली. वडील नसलेल्या मुलाचा आई आपली नोकरी करत मुलाला कसं सांभाळून घेते हे या चित्रपटात दाखवले आहे. आईच्या फिरत्या नोकरीमुळे शहरातून गावात आलेल्या तिच्या मुलाच्या मनावर कसा परिणाम होतो हे या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.
3 / 8
आपली शाळा, आपले नुकतेच बनलेले पण जिवाभावाच्या मित्रांपासून त्याला आईच्या नोकरीमुळे दूर सोडून जावं लागते. हा मुलगा म्हणजे चित्रपटातील हिरो चिनू म्हणजेच अभिनेता अर्चित देवधर. या चित्रपटातून या चिमुरड्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
4 / 8
आता अर्चित देवधर चांगलाच मोठा झाला आहे. आता तो खूप हॅण्डसम दिसतो. पण त्याला ओळखणं खूप कठीण झालं आहे.
5 / 8
अर्चित देवधर हा 'किल्ला' चित्रपटानंतर '६ गन' आणि 'सिद्धांत' अशा मोजक्याच चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटानंतर त्याने अभिनयाला रामराम केला आहे. तो दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
6 / 8
किल्ला सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटामुळे अर्चित यशाच्या शिखरावर असताना त्याने आपल्याला आवडते त्याच क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.
7 / 8
अर्चित अजूनही सिंगलच आहे. पुण्यात जन्मलेला अर्चित शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहॅममध्ये शिकला. त्याला आवडीचं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन तो तिथे काम देखील करू लागला. त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर तुम्हाला त्याने बनवलेल्या अनेक पदार्थांच्या डिश पाहायला मिळतील.
8 / 8
अर्चित देवधर सध्या बर्मिंगहॅममध्ये राहत असून आता सध्या तिकडेच स्थायिक झाला आहे. हिल्टन बर्मिंगहॅम मेट्रोपोल या आलिशान हॉटेलमध्ये तो काम करतो.