Join us  

स्पृहा जोशीची धाकटी बहीण आहे प्रसिद्ध खेळाडू; तिच्या नावावर आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 1:09 PM

1 / 11
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. उत्तम अभिनयासह स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवयित्रीदेखील आहे.
2 / 11
नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रामध्ये स्पृहाचा दांडगा वावर आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
3 / 11
अलिकडेच स्पृहा लोकमान्य या मालिकेत झळकली होती. परंतु, नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
4 / 11
सध्या स्पृहा संकर्षण व्हाया स्पृहा या कार्यक्रमाचे प्रयोग करत आहे. त्यामुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
5 / 11
स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत ती पर्सनल आयुष्याविषय़ीदेखील भाष्य करत असते.
6 / 11
यात सध्या तिच्या बहिणीची चर्चा रंगली आहे. स्पृहाला एक धाकटी बहीणदेखील आहे. तिच्याविषयी फार कमी जणांना माहित आहे.
7 / 11
सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात स्पृहाने तिच्या बहिणीविषयी आणि तिच्या करिअरविषयी खुलासा केला.
8 / 11
स्पृहाच्या धाकट्या बहिणीचं नाव क्षिप्रा असं असून ती एक नावाजलेली खेळाडू आहे.
9 / 11
क्षिप्राने २०१०मध्ये दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा) मध्ये इंडियन ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या कॅप्टन पदाची जबाबदारी पार पाडली होती.
10 / 11
क्षिप्राने १५-२० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या नावे राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियनशिपचा रेकॉर्ड आहे. इतकंच नाही तर तिच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे, असंदेखील स्पृहाने सांगितलं.
11 / 11
क्षिप्राला शिव छत्रपती पुरस्कार मिळाला असून ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये क्षिप्रा जोशी हे खूप नावाजलेलं नाव आहे. ती ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वात तरुण परीक्षक आहे. ती जागतिक पातळीवर परीक्षण करायला जाते. तसेच तिच्याकडे शिकत असलेल्या मुली आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे,” असंही तिने सांगितलं.
टॅग्स :स्पृहा जोशीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा