Join us  

बॉलिवूडकरांना मागे टाकत 'ही' मराठी अभिनेत्री ठरली आशियातील 'सर्वोत्तम अभिनेत्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 1:58 PM

1 / 10
सध्या सोशल मीडियावर मराठी अभिनेत्री स्मिता तांबे हिची जोरदार चर्चा रंगली आहे. तिचा जोराम हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.
2 / 10
जोराम या सिनेमाच्या निमित्ताने स्मिताने अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.
3 / 10
या सिनेमासह स्मिता आणखी एका कारणामुळे चर्चेत येत आहे. ते कारण म्हणजे स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हल.
4 / 10
स्मिताला नुकतंच स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
5 / 10
नुकताच लॉस एंजेलिसमधल्या डाउनटाऊन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्मिताला जोरम या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
6 / 10
स्मिताला हा पुरस्कार एका कोरियन अभिनेत्रींसोबत विभागून देण्यात आला आहे. याविषयी स्मिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
7 / 10
'एका कोरिअन चित्रपटातील अभिनेत्रीला आणि मला असा विभागून 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देण्यात आला. सुंदर हिऱ्यांनी सजलेलं ते मानचिन्ह स्वीकारताना खूप खास वाटत होतं. जागतिक स्तरावर आमचा सिनेमा दाखवणं ही अभिमानाची बाब आहे,' अशा भावना स्मिताने व्यक्त केल्या.
8 / 10
स्मिताचा 'जोरम' हा सिनेमा 8 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
9 / 10
स्मिताने यापूर्वी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात ७२ मैल एक प्रवास, जोगवा, देऊळ या सिनेमांचा समावेश आहे.
10 / 10
मराठीसह तिने बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. यात सिंघम रिटर्न्स, पंगा अशा सिनेमांचा समावेस आहे.
टॅग्स :स्मिता तांबेबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा